जयंत पाटलांची चंद्रकांत पाटलांवर खास शैलीत टीका म्हणाले…

21

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना स्वप्न पडण्याचा छंद असेल तर त्याला मी काहीच करून शकत नाही अशा खास शैलीत जोरदार टोला लगावला आहे.

सर्वजण झोपेत असताना सरकार पडेल अशी भविष्यवाणीही चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर त्यांना स्वप्न पडण्याचा छंद असेल, तर त्यावर काय बोलणार अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर चिमटा काढला.

पुण्यात साखर कारखान्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य करताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.

तसेच राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांत पाटील म्हणतात. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.