आज (28 एप्रिल) कोरोना संसर्ग आणि लसीकरणावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.लॉकाडाऊन, कोरोना नियम यावर बोलताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका शब्दात उत्तर दिले आहे. त्यांनी ”जगाल तर जेवाल” असे म्हणत राज्यात लॉकडाऊन वाढवावा अशी थेट भूमिका मांडली आहे.
शहरापासून ते गावापर्यंत सर्वच ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. त्यानंतर राज्याने लागू केलेल्या ब्रेक द चेनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. तसेच पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.
राज्यात एक गट लॉकडाऊनला विरोध करतो आहे. यावर बोलताना आव्हाड यांनी कडक शब्दात उत्तर दिले आहे. “यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते.
प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतलं एक जण तरी गेलं आहे. माझे एका शब्दात उत्तर आहे, जगाल तर जेवाल. जगला नाहीत तर जेवणार कुठून ? सर सलामत तो पगडी पचास,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.याच बैठकीविषयी बोलताना आव्हाड यांनी वरील भाष्य केले. ते मुंबईत बोलत होते.