गेल्या खूप दिवसांपासून पक्षांतर करण्याची परंपरा चालुच आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी तिकीट दिले नाही यावर नाराजी दाखवून जितेंद्र पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाने जितेंद्र पवार यांनी हातावर घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे खटाव तालुक्यात काँग्रेसची ताकद पुन्हा वाढली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार यांना 2017 मध्ये खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून आणि पंचायत समितीचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरीचे निशाण हाती घेतले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीनंतर त्यांना भाजपने पक्षात घेतले.
हरणाई सुत गिरणीवर कार्यक्रमासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर जितेंद्र पवार यांनी पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार अशी चर्चा सुरू होती. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मतदारसंघ मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. पुसेसावळी गटामधील प्रमुख कार्यकर्ते आणि युवक यांच्या उपस्थितीत पवारांनी घडयाळ हातावर बांधले.