होणाऱ्या पतीच्या वयावरून ट्रोल करणार्यांना गौहर खानचे सडेतोड उत्तर

23

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गौहर तिच्या व जैद मधील वयाच्या अंतरावर बोलली. तिच्या आणि जैदच्या वयात १२ वर्षांचे अंतर आहे. अशी अफवा होती. त्यावरून तिला ट्रोल करण्यात येत होतं. परंतु आम्हा दोघांच्या वयामध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. ही गोष्ट खोटी आहे. असं तीन सांगितलं आहे.

‘बिग-बॉस’विनर गौहर खान येत्या २५ डिसेंबरला कोरिओग्राफर जैद दरबारसोबत लग्नगाठ बांधणार आहे. साहजिकच या लग्नाची चर्चा आहे. गौहर तिच्या होणाऱ्या पतीपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. यावरून गौहर ट्रोल सुद्धा होत आहे. तो माझ्यापेक्षा लहान आहे हे मी मान्य करते, पण १२ वर्षांचं अंतर ही गोष्ट खोटी आहे. वयाच्या अंतरावरून ट्रोल करणं, टीका करणं सोपं आहे. पण याचा त्या जोडप्याच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो हेही खरे आहे असे ती म्हणाली.

लोकांना बोलायला विषय हवे असतात. आणि ते बनवणे सोपे आहे. पण जैद आणि माझ्या नात्यावर अशा ट्रोलिंगचा काहीही परिणाम होणार नाही. आम्ही दोघेही समजूतदार आहोत. त्यामुळे आमचे नाते खूप मजबूत आहे. असे म्हणत तिने ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.