रेखा जरे हत्याकांडातील मुख्या आरोपी पत्रकार बाळ बोठेस अटक!

13

यशस्विनी महिल‍ ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मुख्य सुत्रधार असणारा बाळा बोठे अखेर नगर पोलिसांच्या हाती लागला आहे. बाळा बोठे यांस पोलिसांनी हैदराबाद येथुन अटक केली आहे.

रेखा जरे यांच्या हत्येने अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ ऊडाली होती. ३० नोव्हेंबर २०२० रोजी पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरेंचा खुन झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित‍‍ांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीतून पत्रकार बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे यातील मुख्य अरोपी असल्याचे समोर आले.

बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी मिळून रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. पोलिस‍ांनी भिंगारदिवेला त‍ाब्यात घेतले होते. मात्र बाळ बोठे फरार होण्यात यशस्वी झाला होता. दोन्ही मोबाईल घरिुच ठेऊन त्याने पळ काढल्यामुळे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहचण्यात यश नव्हते. मात्र अखेर त्यास बेड्या ठोकण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.

बोठे यांस शोधण्यासाठी विविध पथकेसुद्धा रवाना करण्यात आली होती. तपास अधिकारी तसेच पोलिस ऊपअधिक्षक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने बोठेच्या निवास्थानी छापे मारले होते. यामध्ये रीव्हॉल्वर आणि काही महत्वाच्या गोष्टी मिळाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.