कंगणाला मिळाला दिलासा; हायकोर्टाच्या निर्णयावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

3

अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेचा निर्णय बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. कंगणाला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राऊत म्हणाले, अभिनेत्री कंगणाने मुंबईची ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’ अशी तुलना केली होती. तसेच मुंबई पोलिसांना माफिया म्हंटल आहे.

कंगणाला कोर्टाकडून दिलासा दिल्यानंतर उत्साही झालेल्या भाजपला ते मान्य आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी असे वक्तव्य करत असेल तर ही बदनामी नाही का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई पालिकेचा निर्णय बेकायदेशीर ठरल्यावर कंगणाने न्यायालयाचे आभार मानत हा लोकशाहीचा विजय आहे असे ट्विट करत स्वागत केले आहे. महानगरपालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यांनंतर तोडकामाचा काढलेले आदेश हे दोन्ही हायकोर्टाने रद्द केले आहे. तो बांगला राहण्यायोग्य होण्यासाठी महानगरपालिकेला काम करून घ्यावे लागेल, असे आदेश हायकोर्टाने पालिकेला दिले आहेत.