बॉलिवूड अभिनेत्री कंगना सध्या चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया कमेंट्समुळे चर्चेत आहे. आता कंगनाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्लीतील रिंकू शर्मा हत्येप्रकरणी तिने केजरीवाल यांना डिवचणारे ट्विट केले आहे.अरविंद केजरीवाल यांचे २०१५ मधील एक ट्विट शेअर करत कंगनाने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दिल्लीमध्ये २५ वर्षीय रिंकू शर्मा या तरुणाची त्याच्याच शेजारी राहणा-यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पीडित रिंकू शर्मा हा भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता.
आपल्या या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी दादरीच्या मॉब लिचिंगमध्ये मारल्या गेलेल्या इखलाखच्या घरी भेट देणार असल्याची माहिती दिली होती. केजरीवाल यांच्या या ट्विटचा संदर्भ देत कंगनाने लिहिले, ‘केजरीवालजी, मला आशा आहे की,तुम्हीदेखील रिंकू शर्माच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना पाठिंबा द्या. तुम्ही एक राजकारणी आहात. आशा आहे आता ‘स्टेटमॅन’ बनाल,’ असे ट्विट कंगनाने केले.
या ट्विटनंतर कंगना जोरदार ट्रोलही झाली. दिल्ली पोलिस राज्याच्या नाही तर केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येतात, याची युजर्सने कंगनाला आठवण करून दिली. केजरीवालांना सल्ला देणा-या कंगनाला अनेकांनी खरीखोटी सुनावली.