देशभरात सध्या किसान आंदोलनाची चर्चा आहे. या किसान आंदोलनाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिलाय. पण कंगना रणौतने या किसान मोर्चाच्या विरोधात एक ट्विट केलं होतं. त्यावरून कंगनाला ट्रोल करण्यात आलं.
आता पंजाबच्या लुधियाना येथील कॉंग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचे एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये खासदार बिट्टू यांनी कंगना रनौतला हिमाचलचे सडलेले सफरचंद म्हटले आहे.
खासदार बिट्टू म्हणाले की, “मला कंगनाला हे स्पष्ट सांगायचे आहे की, आमच्या पंजाबी लोकांमध्ये शेकडो समस्या असतील परंतु आम्ही बाहेरील लोकांना आमच्यामध्ये कधीच घुसू देत नाहीत. मला खात्री आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्याप्रमाणे विरोध केला त्यानंतर हिमाचलमध्ये कंगनाच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल आणि हिमाचलमधील तरुणांनी कंगनाला धडा शिकवेल यानंतर कंगना लपून बसण्यासाठी फक्त नरेंद्र मोदींच्या घरी जाऊ शकेल” आता यावर कंगना काय प्रतिउत्तर देते ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.