प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ट्विट करून पाठींबा दिला आहे. कपिल शर्माच्या ट्विटवर जिगर मेवात नावाच्या एका युजरने गुपचूप कॉमेडी कर, असं ट्विट करून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ५० रुपयांचा रीचार्ज करून फालतूच ज्ञान पाजळू नको’ अस रिट्विट करत कपिल शर्माने देखील त्याची बोलती बंद करत सडेतोड उत्तर दिलं आहे.
केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. ‘शेतकऱ्यांच्या मुद्याला राजकीय रंग न देता चर्चेने हा मुद्दा निकाली काढायला हवा, शेतकरी आमचा अन्नदाता आहे, आम्ही सर्व देशवासी शेतकरी बांधवांच्या सोबत आहोत’असं ट्विट करत कपिल शर्मा ने शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. त्याच्या या ट्विटवर ‘चूपचाप कॉमेडी कर, तुझं जे काम आहे त्यावर लक्ष दे. अस म्हणत एका युजरने कपिलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
पंजाब हरियाणाचे शेतकरी गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत रस्त्यावर उतरले असून जंतर मंतर आंदोलनाला परवानगी द्यावी अशी मागणी करत आहेत .युजरने केलेल्या ट्विट वर शांत न बसत, मी माझं कामच करतोय. तुम्हीही तुमचं काम करा. देशभक्त लिहिल्याने कोण देशभक्त होत नाही. काम करा आणि देशाच्या विकासामध्ये हातभार लावा. ५० रुपयांचा रीचार्ज करून फालतुच ज्ञान पाजळू नका, धन्यवाद. असं सणसणीत उत्तर कपिल शर्माने ट्रोल करणाऱ्याला दिल आहे.