पाच राज्यातील निवडणुकांवर अधिक भाष्य करणार नाही. योग्य वेळ आल्यावर यावर बोलेन. करोना काळात सर्वांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे’, असं काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सांगितलं.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेस एकही जागा मिळवू न शकल्याने त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले पाहीजे आपण करोनाची लढाई एकत्र लढली पाहीजे. निवडणुका वेगळी बाब आहे. मात्र इथे जीवन मृत्यूचा संघर्ष आहे’, असं सांगत पंतप्रधान करोना स्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचं सांगितलं.
पुद्दुचेरीसुद्धा काँग्रेसच्या हातून गेल्यानं त्यानं पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं बोललं जात आहे.