आजच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांचं मोठं विधान म्हणाले ….

111

4 राज्ये आण‍ि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी आज होत असून, मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड होणार आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आण‍ि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आसाममध्ये तीन तर पश्च‍िम बंगालमध्ये सर्वाधिक 8 टप्प्यांमध्ये मतदान झाले. याच दरम्यान काँग्रेस नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी मोठं विधान केलं आहे.

सिब्बल यांनी “आज निकालाचा दिवस आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फायदा नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे” असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी निर्बंध लावले आहेत. उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर प्रवेशासाठी आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह बंधनकारक केली आहे.