करण जोहरच्या जुळ्या मुलांची बर्थडे पार्टी, ‘या’ स्टारकिड्सनी लावली हजेरी

8

बॉलिवूड चित्रपटांचा निर्माता करण जोहरची मुले यश आणि रुही 7 फेब्रुवारीला 4 वर्षांची झाली आहेत. मुलांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 2017 ला करण दोन जुळ्या मुलांचा पिता झाला होता. करणने त्याच्या मुलांचे नाव त्याचे वडिल यश जोहर आणि आई रुही जोहर यांच्या नावावरून ठेवलं आहे.

दोन्ही मुलांच्या वाढदिवशानिमित्त करणने घरी एका ग्रॅंन्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी तैमुर अली खान आई करिनासोबत, अब्राम गौरी खानसोबत, मेहर नेहा धूपियासोबत या पार्टीला पोहोचले होते. इतकेच नाही तर तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य आणि राणी मुखर्जीची मुली देखील या पार्टीला आले होते.

यश आणि रुही यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली आहेत. करिना कपूर खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली होती. करणने आपल्या मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता त्या व्हिडीओमध्ये यश आणि रूही दोघेही दिसत होते. करणने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते की, आज माझ्या आयुष्यातील प्रेमाचा वाढदिवस आहे.