करण म्हेत्रेंचे निधन; अंत्यसंस्कारासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी

63

सोलापुरात मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यानंतर रविवारी म्हेत्रे यांच्या अंत्यदर्शनासाठी शकडो समर्थकांनी गर्दी केली. सोलापुरात लॉकडाऊन लागू असतानाही गर्दी जमली. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवल गेलं.

करण म्हात्रे हे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. करण म्हात्रे हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. शनिवारी दुपारी त्यांनी सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हेत्रेंच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांचे समर्थक कार्यकर्ते हॉस्पिटलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमा झाले.

आज रविवारी सोलापुरात म्हेत्रेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला त्यांच्या जमल्याने सोशल डिस्टन्सिंग  नियम पायदळी तुडवले गेले. घटनेचे व्हिडीओ समोर आले  आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला.