कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कारजोळ यांनी थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हक्क दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच अस वक्तव्य करून ते बरळले आहेत.
गोविंद कार्जोळ यांनी असाही दावा केला आहे की, कर्नाटकात दुष्काळ पडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत, असा अजब दावा गोविंद कार्जोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी तो वाचलाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले होतेतसेच, कर्नाटकात मराठी, कन्नड जनता प्रेमाने राहते. जात मराठा असली तरी ते कन्नडच आहेत. महाराष्ट्रात देखील कन्नड मराठी जनता प्रेमाने राहते, असे गोविंद कार्जोळ म्हणाले.