पिंपरी चिंचवड पोलिसांचा एक्स ट्रॅकर उपक्रम आणि समाज माध्यमांवरील पेजेसचा सोहळा चिंचवड येथे पवार यांच्या हस्ते पार पडला.सराईत आणि तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक्स ट्रॅकर हे ॲप्लिकेशन तयार केले आहे. तडीपार गुन्हेगारांना दररोजची माहिती या माध्यमातून पोलिसांना द्यावी लागेल.
समाज माध्यम हे धारदार अस्त्र आहे. हे माध्यम वापरताना काळजी घ्या. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देताना डोक्यावर बर्फ ठेवा. आपल्यातील तापटपणा काढून टाका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ५) पोलिसांना दिला. काम करताना काही गडबड झाली तर, मी थेट टीका करेन असेही त्यांनी यावेळी त्यांना इशारा दिला.
समाजमाध्यम वापरताना ध चा मा होऊ नये, यासाठी अधिक काळजी घ्यायला हवी. समाज माध्यमांवर लाखो लोक तुमच्याशी जोडलेले असतात. त्यांना अचूक माहिती दिली पाहिजेठाणी स्मार्ट करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे अनुकरण करा अशी सूचना करणार असल्याचे पवार म्हणाले.
स्मार्ट पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर टवटवी दिसते. पिंपरी-चिचंवडमधील अनेक ठाणी स्मार्ट झाली असली, तरी राज्यातील बऱ्याच ठाण्यांची अवस्था बिकट आहे.पिंपरी-चिंचवड हद्दीत पोलीस ठाणे वाढविण्याची मागणी केली जात आहे.
यावेळी आमदार दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार उपस्थित होते.