पुण्याच्या पाहुण्याला सक्तीने विलगीकरणात ठेवा : बाळासाहेब थोरात

114

पुण्याशी मोठा संपर्क असल्याने तेथून गावी आलेल्या पाहुण्याला सक्तीने विलगीकरणात ठेवा अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. थोरात यांनी शनिवारी पारनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. 

येत्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा दूर केला जाईल असे महसूलमंत्र्यांनी सांगितले.तसेच इथली रुग्णसंख्या जास्त का आहे ? अशी विचारणा थोरात यांनी केली.

प्रशासनाने लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याचं ते म्हणाले. येत्या 30 तारखेपर्यंत अशीच शिस्त पाळली तर पारनेर तालुक्याचा आकडा सर्वात कमी असेल असे थोरात म्हणाले.