आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटीलचं मैत्रिणींच्या घरी केळवण

24

गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी सेलेब्रेटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्न नुकतच पार पडले आहे. आता बिग बॉस सिझन १ फेम अभिनेता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशी चर्चा सुरू आहे.

सोशल मिडियावर स्वप्नाली आणि आस्ताद नेहमी चर्चेत असतात. ते चाहत्यांसाठी सक्रिय असतात. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना आता सुरुवात झाली आहे. लग्नाच्या तयारीची खरी सुरुवात ही केळवणापासूनच होते. स्वप्नालीच्या जिवलग मैत्रिणींनी केळवणासाठी या दोघांना घरी बोलावले आणि त्यांचा पाहुणाचार केला आहे.

हर्षदा खानविलकर आणि शर्मिला शिंदे यांनी आस्ताद-स्वप्नालीचं केळवण केले आहे. लग्नाआधी वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून जेवणासाठी पाहुण्यांकडे आमंत्रित केले जाते त्यासोबत भेटवस्तू आणि लग्नाबाबत शुभेच्छा दिल्या जातात. शर्मिला शिंदेने सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत या दोघांना आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यांचा केलवणाचा कार्यक्रम पूर्ण केला आहे.