खडसेंचा गौप्यस्फोट, “ती सीडी ऊघड करतो”

19

एकनाथ खडसे कुणाचेही नाव न घेता गौप्यस्फोट केला आहे. “तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपला इशारा दिला. परिणामी एकनाथ खडसे यांच्या या विधानामुळे विविध चर्चांना उधान आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमीत्त जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संपूर्ण राज्याचा दौरा करत आहे. या कार्यक्रमात कार्याकर्त्यांशी संवाद साधण्यात येऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. यादरम्यानच जयंत पाटील आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात त्यांचा दौरा होता. यावेळीच एकनाथ खडसे यांनी हे विधान केले आहे.

“मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटील यांनी एक विधान केले होते. तुमच्यामागे आता ईडी लागू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेन असे म्हणालो होते. आता प्रत्यक्षात माझी ईडी चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार आहे,” असेसुद्धा एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी १० जागा लढवते. येथे पक्ष बळकट करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणे आवश्यक आहे. असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.