शिवसेनेचा हा बडा नेत इडीच्या रडारवर, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

193

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे नाव घेऊन आरोप केले होते. अडसूळ हे ईडीच्या रडारवर असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं.

अडसूळांची तक्रार रिझर्व्ह बॅंकेकडे करणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं. त्यामुळे वर्षा संजय राऊत यांच्यानंतर आता अडसूळ यांच्यावर इडी कारवाई करेल असा अंदाज आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी आनंदराव अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आनंदराव अडसूळांबद्दल आम्ही रिझर्व्ह बॅंकेला कळवणार आहोत. “बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बॅंक असो किंवा सिटी बॅंक, दोषींवर कारवाई होणार” असा गर्भित इशारा सोमय्यांनी दिला. असंही सोमय्या यावेळी म्हणाले.