महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आल्यानंतर लगेच कोरोना महामारीने डोके वर काढल्याने शिवसेनेस संघटनात्मक बळकटीकरणांस वेळच मिळाला नाही. एकेकाळी महाराष्ट्राच्या पाचशे लोकसंख्या असणार्या गावापर्यंत पोहचलेली शिवसेना मध्यंतरी कमकुवत झाल्याचे चित्र होते. मात्र महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना प्रमुख ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेने पुन्हा ऊभारी घेण्यास सुरुवात केली. आता शिवसेनेस पुन्हा महाराष्ट्रात संघटनात्मक बळकटीकरण देण्याकरीता शिवसेना राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवणार असल्याचे शिवशनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांना आलेले यश बघता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमिवरच बुथ पातळीपासून शिवसेनस मजबुत करण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. २४ फेबृवारी ते २७ फेबृवारीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेचे कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहे. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात शिवसेनेचे प्रत्येकी एक आमदार आणि खासदार फीरणार आहेत. पदाधिकारी रस्त्यावर ऊतरुन संपर्क करत कार्यकर्त्यांच्या समस्या जाणू घेणार आहेत. तसेच महाविकासआघाडी सरकारचा विकासकामांचा लेखाजोखासुद्धा या माध्यमाने जनतेपर्यंत पोहचवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर नुकतीच शिवसेनेची मोठी बैठक पार पडली. यामध्ये आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि काही मंत्र्यांचा समावेश होता. अशी माहिती शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे.
२०२२ मध्ये बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत. अभियानातून या निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची शिवसेनेची ही सर्वात मोठी आणि महत्वाची बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांची प्रमुख ऊपस्थिती होती. सोबतच काही खासदार आणि आमदारही या बेठकीत होते. यावेळी ऊद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकारवर भाष्य करत जमलेल्या पदाधिकारी, नेत्यांना मार्गदर्शन केले असल्याचेसुद्धा कळते आहे.