वडील राजेंद्र पवारांना कृषिरत्न पुरस्कार जाहीर; रोहित पवारांनी बाबांचं असं केलं अभिनंदन !

80

कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – २०१९’ कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांना जाहीर झाला.

या सन्मानाबद्दल आमदार रोहित पवार यांनी आपल्या बाबांचं म्हणजेच राजेंद्र पवार यांचं आणि इतरही वेगवेगळे पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. राजेंद्र पवार यांनी बारामती आग्रिकल्चर डेव्हलपमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील प्रयोगशील शेती बारामतीत केली आहे. त्याचीच दखल कृषी विभागामार्फत घेण्यात आली आहे.

कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजाच्या हितासाठी सदैव काम करत असताना त्याची दखल अशा पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जाते, तेंव्हा अधिक आनंद वाटतो असं रोहित पवार म्हणाले. पुरस्कार जाहीर झालेले सर्व सन्माननीय भविष्यातही कृषी आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.