राजेंद्र पवार यांना कृषिक्षेत्रातील कृषीरत्न पुरस्कार जाहीर

29

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – 2019’ राजेंद्र पवार यांना जाहीर झाला आहे.

राजेंद्र पवार हे बारामती कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन आणि आमदार रोहित पवार याचे वडील आहेत. ते वेळोवेळी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात.

यासंदर्भात माहिती स्वत: रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे.वडिलांना ‘कृषीरत्न’ पुरस्कार जाहीर, रोहित पवारांनी असे ट्विट करत  वडिलांचे अभिनंदन केले आहे.