कृष्णाई सोशल फाउंडेशन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रक्तदान शिबिरांचं आयोजन करत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी म्हणजेच 5/11/2020 रोजी शिर्सुफळमध्ये कृष्णाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक शुभम ताटे यांनी रक्तदान शिबिराच आयोजन केलं होतं. यावेळी कृष्णाई टीमच्या वतीने रक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या. यावेळी पार पडलेल्या रक्तदान शिबिरात जवळपास 186 जणांनी रक्तदान केलं. तर अनेकांचं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांना रक्तदान करता आले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधिलकी जपत, गोजुबावीत क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने आणि कृष्णाई टीमच्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबिराच आयोजन केल होतं. यावेळी गावातील मंडळींनी रक्ततपासणी केली व अनेकांनी रक्तदानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन करण्यात येत आहे. याच उद्देशाने कृष्णाई सोशल फाउंडेशनने हवामानाचा अंदाज घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं, याला चांगला प्रतिसाद मिळाला.