कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधिलकी जपत, गोजुबावीत क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने आणि कृष्णाई टीमच्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबिराच आयोजन केल होतं. यावेळी गावातील मंडळींनी रक्ततपासणी केली व अनेकांनी रक्तदानाला उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. कृष्णाई टीमच्या वतीने रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. रक्तदान शिबिरावेळी सातारामधील अक्षय ब्लड बँकेने आपली कामगिरी चोख पणे पार पाडली. यावेळी डॉ. राहुल खामकर, डॉ. राजू राठोड, डॉ. अतुल साळुंखे, डॉ. सागर जाधव, डॉ. धीरज खुडे, डॉ. रुपाली मोटे यांनी आपली कामगिरी व्यवस्थित रित्या पार पाडली.
देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन करण्यात येत आहे. याच उद्देशाने पांडुरंग जाधव व सुनील जाधव मित्र परिवाराने हवामानाचा अंदाज घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं, याला चांगला प्रतिसाद मिळाला.