कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने छगन भुजबळ यांच्या वाढदीवसानिमित्त रक्तदान शिबीर

8

कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने पारवडीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा मंत्री) यांच्या वाढदिवसानिमित्त भुजबळ समर्थक शरद होले आणि हनुमंत होले यांनी भव्य रक्तदान शिबिराच आयोजन केलं होतं. यावेळी 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच यावेळी रक्तदान करण्यासाठी अनेक महिलांनी देखील हजेरी लावली. मात्र हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असल्यामुळं रक्तदान करता आले नाही. यावेळी डॉक्टरांनी महिलांना योग्य आहाराचा सल्ला दिला. तसेच जवळपास 300 जनांनी आपली रक्ततपासणी केली.

देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन करण्यात येत आहे. याच उद्देशाने शरद होले आणि हनुमंत होले यांनी आयोजन केले होते. यावेळी कृष्णाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक द्या नरुटे, संस्थापक शुभम ताटे, संस्थापक आकाश कदम यांच्या वतीने रक्तदात्यांना ट्रॅकसुटचे वाटप करण्यात आले. आजचे राज्यातील कृष्णाई फाउंडेशनचे हे पाचवे रक्तदान शिबिर होते. कृष्णाई फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.