राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. राज्यात लस तुटवडा निर्माण झाला आहे. यासर्व गोष्टींवर सध्या राज्यातील महविकास आघाडीचे नेते लक्ष ठेऊन आहेत. काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाचा स्पोट हा केंद्र सरकारमुळे झाल्याचं म्हटलं आहे.
देशात कुंभमेळा आणि निवडणुका घेतल्या गेल्या. त्यामुळे कोरोनाचा मोठा स्पोट झाला. त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. त्याचे परिणाम देश भोगत आहे. कोरोना वाढवण्यात देशाचं नेतृत्व जबाबदार आहे. अशी टीका बालासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
देशाचं लसीकरण होण्याआधीच लस निर्यात करणं हा केंद्र सरकारचा दांभिकपणा होता. असा घणाघातही थोरात यांनी केला. बाळासाहेब थोरात हे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.