‘लागिर झालं जी’ फेम जिजी यांचे कर्करोगाने निधन

4

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिर झाली जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके (जिजी) यांचे शनिवारी निधन झाले आहे. त्या 74 वर्षाच्या होत्या. त्या बंगळुरूमध्ये आपला मूलगा सुनील यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. जीजी यांचे निधन झाल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व कलाकारांनी श्रद्धांजली वाहीली आहे. काही दिवसांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर बंगळुरू येथे उपचार चालू आहेत. 14 नोव्हेंम्बरला सायंकाळी त्यांचे निधन झाले आहे.

कराड येथे त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ मध्ये त्यांनी अजिंक्यची आजीची (जिजी) भूमिका केली होती. कमल ठोके यांनी 33 वर्ष शिक्षिका म्हणून नोकरी केली होती. त्यांचे पती गणपती ठोके देखील शिक्षक होते. त्यांनी यासोबत अभिनय आणि संगीताची आवड देखील नेहमी जोपासली. ऐन दिवाळीत त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

कमल ठोके यांच्या पाश्चात मुलगा, सून, नातवंडे आणि मूलगी असा परिवार आहे. ठोके यांचे पार्थिव दि.15 नोव्हेंम्बरला सकाळी 6 वाजता कराड येथे मंगळवार पेठ, कमळेश्वर मंदिर येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. अंत्यदर्शनानंतर अंत्यविधी कमळेश्वर मंदिरा शेजारील स्मशानभूमीत सकाळी 10 वाजता होणार आहे.