मराठी सिनेसृष्टीत लग्नसराई सुरुचं, आता ‘हा’ मराठी अभिनेता अडकला विवाहबंधनात

15

मराठी चित्रपटसृष्टीत लॉकडाउनच्या काळात लग्नसराई सुरू आहे. नुकतीच अभिनेत्री अभिज्ञा भावे तिचा बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत विवाह बंधनात अडकली आहे. असंभव, दुनियादारी या झी मराठीवरील मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी यांचा अभिनेत्री रुचिका पाटील हिच्यासोबत विवाह संपन्न झाला आहे.

८ जानेवारी २०२१ रोजी पुण्यामध्ये मोठ्या थाटात हा विवाह पार पडला आहे. या लग्नसोहळ्याला धनश्री काडगावकर आणि अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अविनाश नारकर यांनी आपली पत्नी ऐश्वर्या नारकर यांच्यासह हजेरी लावली होती. अत्यंत साधेपणाने हा विवाहसोहळा संपन्न झाला असून या लग्नसोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी जवळच्या आणि कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. अभिनेता आशुतोषने लेक माझी लाडकी, असंभव,साथ दे तू मला, गंध फुलांचा गेला सांगून, चेकमेट या मालिका तसेच चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत या वर्षी लग्न बेडीत अडकणार आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.