सर्वसामान्यांनसाठी लालपरी पुन्हा धावणार

24

एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनाच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले होते.

अडीच महिन्यांच्या खंडानंतर एसटी महामंडळाच्या बस सेवेला 1 जून पासून सुरुवात झाली असून गुरुवारी औरंगाबाद विभागातून पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, जालना आदी मार्गावर सुमारे 26 बसेस धावण्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

हळूहळू प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता असून प्रवासी संख्या वाढताच विविध मार्गावर आणखी बस सेवा देण्यात येईल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.