महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.मात्र सध्या कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा सुरु आहे.
येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
तसेच ज्यांनी दोन लस घेतल्या असतील तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.