लासुर स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे यांनी आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या

32

लासूर स्टेशन प्रतिनिधी संजय शर्मा

गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी आज दबंग कारवाई केली असून पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवळल्या दरोड्याचा तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या..आज रात्री साई शंकर पेट्रोलपंप,लासूर स्टेशन जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत सराईत गुन्हेगार१)प्रमोद शिरसाट २)जितू गायकवाड दोघे राहणार डोमेगाव३)ताराचंद भोसले ४)रवी भोसले ५) शक्तुर भोसले ६) सोनू सर्व राहणार गाजगाव ता गंगापूर.

यांच्याविरुद्ध दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल..यातील २ आरोपी कडून एक तलवार,काठ्या,लोखंडी गज आणि एक स्कॉर्पिओ गाडी जप्त केली असून पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या पथकात हेडकॉन्स्टेबल पवार,पोलिस कॉन्स्टेबल दुलत, पोलीस कॉन्स्टेबल अनिल दाभाडे, यांचा सहभाग होता. दरम्यान शिल्लेगाव पोलीसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.