इगो सोडा आणि आरेमध्ये काम करा :देवेंद्र फडणवीस

18

मुंबई हायकोर्टाने कांजूरमार्गमध्ये सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामाला जैसे थे ठेवण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले आहे. सरकारने आता इगो सोडून आरेमध्ये काम करावे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला चपराक आहे. सुप्रीम कोर्टाने आधीच या आरेतील जागेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तरी इगो सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. राज्य सरकारने एमएमआरडीला दिलेला कांजूरमार्गची जागा हा निर्णय चुकीचा आहे.ही जागा पहिल्यापासून वादात होती. जर कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड करायचा असेल तर चार वर्ष आणखी विलंब होणार आहे.अधिवेशनात सुद्धा मी हीच भूमिका मांडली होती. पण मुख्यमंत्र्यांनी मिठाचा खडा का टाकता असं म्हणाले होते, पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसंच 4 हजार कोटींचा भुर्दंड सुद्धा राज्य सरकारला बसणार आहे. तरी सुद्धा राज्य सरकार हट्ट का करत आहे, हे कळायला मार्ग नाही’ असा टोला फडणवीसांनी लगावला.दरम्यान,राज्य सरकारचे जवळपास साडे पाच हजार कोटी वाचणार आहे आणि एक कोटी लोकांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे,मेट्रो लाईन 3 प्रमाणेच मेट्रो लाईन 6, 4 आणि 14 साठी ही जागा अत्यंत मोक्याची आहे.आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, हे खरं आहे असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.