पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे कायमच आपल्या चांगल्या कामासाठी चर्चेत असतात. सध्याच्या कोरोना काळात त्यांज उल्लेखनीय काम आपल्या मतदारसंघात सुरू केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, असे विधान आमदार निलेश लंके यांनी केलं आहे.
मतदारसंघातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा विडा लंके यांनी उचलला आहे. लंके यांनी मतदारसंघात कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. स्वतः आमदार लंके रात्रंदिवस कोविड सेंटर मधील रुग्णांची काळजी घेत आहेत.
निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 बेडच कोविड सेंटर उभारले आहेय. त्यात 1000 बेड आणि ऑक्सिजन युक्त 100 बेड आहेत. आमदार निलेश लंके यांनी या कोविड सेंटरला शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर असे नाव दिले आहे.