पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांविरोधात चलो दिल्ली आंदोलन

3

सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारनं तीन कृषी कायद्यांना मंजुरी दिली होती. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी आवाज उठवला होता. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्ली आंदोलन सुरु केले असून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. शेतकऱ्यांचा विरोध पाहता हरियाणा सीमा सील करण्यात आली आहे. 26 आणि 27 नोव्हेंबरला सीमा बंद राहणार.

कृषी कायद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ महामोर्चा काढला आहे. दिल्लीकडे निघालेल्या या मोर्चाला हरयाणामध्ये अंबाला-पटियाला बोर्डवर अडवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली आहे. सीमेवरच अडवणाऱ्या पोलिसांच्या दिशेने कूच करत शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स फेकून दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे अंबाला-पटियाला सीमेवर प्रचंड तणावाचं वातावरण आहे.