‘मराठा आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू’

3

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापलेला आहे. आरक्षणाच्या मागणीवरून विविध मराठा संघटना आक्रमक होतांना पाहायला मिळतायत. एका बाजूला हे तर दुसऱ्या बाजूला अखिल भारतीय मराठा महासंघाने आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू असा इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, सरकार कोणाचंही असो, या नेत्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्रालयातल्या फाईली जाळल्या आहेत, पुरावे नष्ट केले परंतु मराठा आरक्षणासाठी आता आम्ही सगळे मराठा तरूण अख्खं मंत्रालय जाळून टाकू. मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे हा आमचा इतिहास आहे असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिलंय.