सत्य कसं डिलीट होऊ शकतं, तेच पाहुया’ महिला खासदाराने सुनावले मोदी सरकारला खडेबोल !

21

सध्या देशभारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना संसर्ग होऊन आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडत असल्याची टीका सर्व बाजूंनी केली जात आहे. यावरून ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे, त्यातच असे ट्विट काढून टाकणायचे आदेश मोदी सरकारने दिले आहे.

मात्र या आदेशावरून अनेक जणांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या प्रकारावरून आता टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारला लक्ष करत सत्य कसे डिलीट होईल, अशी टीका केली आहे. काही जणांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेल्या टिकेवरून केंद्रातील मोदी सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनेही टीका करण्यात आलेले काही जणांचे ट्विट डिलीट केले होते. यावरून अनेकांनी मोदी सरकारला लक्ष केले होते.

या प्रकरणावरून टीएमसीच्या खा. महुआ मोईत्रा ह्या सुद्धा संतापल्या होत्या. पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी, खासदार रेवंथ रेड्डी, अविनाश दास यांच्यासह अनेकांनी कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन केंद्र सरकारवर ट्विटवरुन टीका केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस बजावली. त्यानंतर भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे ट्विट असल्याने ते डिलीट केले जात असल्याचे ट्विटरने देखील म्हटलं आहे. यावरूनच खा. मोईत्रा यांनी मोदी सरकारला लक्ष करत टीका केली आहे.