‘महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले, कोरोना विरुद्धचे युद्ध २१ दिवसांत जिंकू’ त्या वल्गनेचे काय झाले? : चिदंबरम

34

एकेदिवशी सरकारने लसीकरण मोहिमेला ‘उत्सव’ म्हटले आणि दुसऱ्याच दिवशी त्या मोहिमेला ‘दुसरे युद्ध’ म्हणत आहे. यापैकी ही मोहीम नेमकं काय आहे? असा सवाल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

तुम्हाला आठवतंय का, पंतप्रधानांनी जेव्हा लॉकडाऊन जाहीर केला होता, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांनी असा दावा केला होता की महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते, आपण कोरोना विरुद्धचे युद्ध २१ दिवसांत जिंकू. त्या वल्गनेचे काय झाले? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

फुकाची बढाई, भाषणं आणि अतिरंजितपणाने कोरोना विरुद्धचे युद्ध यशस्वी होणार नाही. सरकार लसींचा पुरवठा आणि वितरण करण्यात मोठ्या प्रमाणात आलेले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. असेही ते म्हणाले. त्यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून मोदी सरकारला प्रश्न केले आहेत.