LIC ची जबरदस्त योजना महिन्यातून एकदा पैसे भरा आणि दरमहा ३६,००० रुपये पेन्शन मिळवा

2

जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. जीवन अक्षय पॉलिसी एक प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल एन्युटी योजना आहे. त्यात किमान १,००,००० रुपये गुंतवून पॉलिसी सुरू करता येते. या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

या पॉलिसीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने कमीत कमी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्यांना वार्षिक १२,००० रुपये पेन्शन मिळेल. म्हणजेच दरवर्षी १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १२,००० रुपये पेन्शन म्हणून मिळतील. जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. कारण पॉलिसीधारक त्याच्या इच्छेनुसार त्यात गुंतवणूक करू शकतो. पेन्शनची रक्कम गुंतविलेल्या पैशावर अवलंबून असते.