भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एक विधान केलं आहे. काल सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. त्याचा आधार घेत त्यांनी राज्य सरकारला कोपरखळी मारली.
सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. राज्यातील आघाडी सरकार कधीही कोसळले. तेही कळणार नाही. तसे संकेत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काल सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला होता. त्याबाबत प्रवीण दरेकर माध्यमांशी बोलत होते. सह्याद्रीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळतो आणि सरकारला माहीतही पडत नाही. तसंच हे सरकार कधीही कोसळेल. ते कळणारही नाही. असे दरेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचं असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असेही दरेकर म्हणाले आहेत.