अंबानी यांच्या घरासमोर कारमध्ये स्फोटके ठेवल्याची लिंक तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरपर्यंत

21

२६ फेबृवारला ऊद्योपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार निर्जन अवस्थेत आढळून आली होती. जैस ऊल हिंद या दहशतवादी संघटनेने याची जवाबदारी घेत खंडणी देण्यासंबद्धीचा एक संदेश टेलीग्रानद्वारे केला होता. याप्रकरणाची चौकशी सुरु असतांना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली येथील तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तर याच्या बराकीतून याप्रकरणी एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

तहसीन हा मुजाहिद्दीनचा दहशतवादी आहे.
ज्या टेलीग्राम चॅनेलवरुन अंबानींना धमकीचा संदेश आला होता, ते टेलीग्राम चॅनेल याच मोबाईलवरुन तयार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तहसीन हा पटनाच्या गांधी मैदानातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील बॉम्बस्फोट, हैदराबाद बॉम्बस्फोट आणि बोधगया बॉम्बस्फोटमध्ये सहभागी होता.

टेलीग्रान चॅनेलच्या मोबाईल नंबरचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दिल्लीतील तिहार जेलमध्ये छापे मारले. यादरम्यान तहसीन अख्तरच्या बराकीमधून मोबाईल जप्त करण्यात आला. त्यामध्ये टोर ब्राऊजरद्वारे व्हर्च्युअल नंबर बनवण्यात आला होता आणि त्यावरच पोस्टरसुद्धा बनवण्यात आले होते.

दिल्ली स्पेशल सेलकडून तहसीन यांस स्पेशल रिमांडवर घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे. मुकेश अंबानीच्या घरासमोत आढळलेल्या त्या स्फोटकांनी भरलेल्या कारचे धागेदोरे दिल्लीतील कैदेत असणार्‍या दहशतवाद्यांपर्यंत पोहचल्याने तपास यंत्रणा तसेच सामान्यांना धक्काच बसला अाहे.