पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सने केंद्र सरकारला ‘ही’ शिफारस केलीय

9

देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशात लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेवर विचार करावा असा सल्ला दिला होता. त्यातच आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनेसुद्धा देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के. पॉल आज पंतप्रधानांना कोरोना विषयीचा अहवाल सादर करणार आहेत.