कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होउ लागल्याने पुन्हा एकदा शासन आणि प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. अारोग्यमंत्रि राजेश टोपे यांनी पुन्हा जलद बैठकांना सुरुवात केली आहे. तर ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेच्या बेजवाबदार वागण्यावर बोट ठेवत पुन्हा निर्बंध कडक करावे लागतील असा ईशाराच दिला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांचा आलेख अचानक वाढतो आहे. मुंबईसुद्धा यास अपवाद नाही. गेल्या चार महिन्यातील ऊच्चांकी गाठणारी आकडेवारी समोर येते आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी लोकांना सजग आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. “अन्यथा मुंबई पुन्हा लॉकडाऊन करावी लागेल” वाढत्या रुग्णसंख्येबाबत माध्यामांशी बोलरतांना त्यांनी ही प्रतीक्रिया दिली आहे.
मुंबईत पुन्हा कोरोना वेगाने पसरतो आहे. कोरोनाबाधीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्क्यांवर गेले आहे. चेंबुरमधील काही भाग लॉकडाऊन करण्याचा निर्णयसुद्धा महापालिकेने घेतला आहे. तसेच मुंबई विद्यापिठाशी संलग्न विद्यालये-महाविद्यालयेसुद्धा २२ फेबृवारीपर्यंत बंदच असेल असा निर्णय झाला आहे.
“कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे. बहुतांश लोक हे विनामास्कनेच लोकलने प्रवास करतात. लोक आवश्यक ती काळजी घेत नसल्याचे चित्र आहे. लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावा लागु शकतो. आता हे सर्व लोकांच्याच हाती आहे.” असे किशोरी पेडणेकर यावेळी बोलत होत्या.
गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्राच्या विविध भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नागपुरात एकाच दिवसांत ५०० रुग्णांची भर पडली होती. या पार्श्वभूमिवर वेगवान बैठकांचे सत्र सुरु आहे. अमरावती विद्यापिठाशी संलग्नीत महाविद्यालये २८ फेबृवारीपर्यंत बंद असणार असल्याचा निर्णय झाला आहे. जिल्हा प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. लग्नसोहळे, विविध समारंभ यांवर पुन्हा बंधने येणार असण्याची शक्यता आहे.