पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही :गिरीश बापट

21

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी परिस्थिती पाहून २ एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ असे सांगितले होते. मात्र खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊन विरोध करत पुन्हा लॉकडाऊन परवडणार नसल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे. साथीचे रोग ही राज्य सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे राज्य सरकारने पुणे महापालिकेला 500 कोटी रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.असे बापट बोलताना म्हणाले.

लॉकडाऊन हा अंतीम पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊन आमचा सक्त विरोध आहे. लॉकडाऊनऐवजी रूग्णांसाठी खाटा वाढवा, लसीकरण वाढवा, विलगीकरण कक्ष उभे करा असा आमचा आग्रह असून पायाभूत सुविधा वाढविणे हाच यावर पर्याय आहे.असे बापट यांनी स्पष्ट केले आहे.