“नारायण राणेंच्या वक्तव्यांकडे विनोदाने बघा”, पवारांची राणेंवर टीका

13

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह दि. ७ फेबृवारी रोजी महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. सिंधुदुर्ग येथील राणेंच्या मेडीकल कॉलेजच्या ऊद्घाटनासाठी ते येत आहे. यावेळी नारायण राणे यांनी अमित शाहांसाठी जय्यत तयारी केली आहे. यादरम्यान “अमित शाह यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार जावं” असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत नारायण राणे यांना मिश्कील ऊत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले “नारायण राणे आमचे जुने सहकारी आहेत. परंतू ते विनोदसुद्धा करतात हे आम्हाला माहिती नव्हते. नारायण राणेंच्या वक्तव्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही, त्यांच्या वक्यव्यांकडे विनोद म्हणून बघायचे” अशा शब्दांत शरद पवार यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव आहे. ते काहीकाळ शिवसेनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहे. राणेंची कारकिर्द गोंधळात टाकणारी आहे. त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेला रामराम करत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असून ते कायम भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका घेत असतात. याअगोदरसुद्धा नारायण राणे यांनी राज्यातील महाविकासआघाडीचे सरजार पडणार असल्यासंबंद्दीचे वक्तव्य केले आहेत. परंतू त्यांच्या वक्तव्यांनी महाविकासआघाडीतील सरकारवर तसूभरही फरक पडलेला नाही. त्यामुळेच कदाचित शरद पवार यांनी राणेच्या वक्तव्याची तुलना विनोदासोत केली आहे.

नारायण राणेंनी नुकतेच सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केले आहे. या महाविद्यालयाच्या ऊद्घाटनासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि ईतरही भाजपाचे मोठे नेते यावेळी ऊपस्थित असणार आहे.