औरंगाबाद शहराच्या नावावरून होणार वाद अजूनही संपायच नाव घेत नाहीय. शहरातील छावणी परिसरात असलेल्या ‘लव्ह औरंगाबाद’ या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी दखल घेतली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराच्या नावावरुन गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि एमआयएमच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले होते.
स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग अंतर्गत संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, तसेच औरंगाबादचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत.
सोबतच शिवसेना आमदार आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठानने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार करून लावण्यात आला होता. संभाजीनगर या नावावरून मोठा वाद होत आहे. एम आय एम चे खासदार जलील यांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.