बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे एकत्र फोटो नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आज 14 फेब्रुवारी हा आपल्या प्रेमभावना व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी सर्वच लोक एकमेकांना प्रपोज करतात आणि प्रेम व्यक्त करतात. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा रोमँटिक मूडमध्ये आहेत. नुकताच मलायका अरोरा तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर अर्जुन कपूरचा फोटो शेअर केला आहे.
यामध्ये स्टोरीमध्ये अर्जुनने घातलेल्या टी-शर्टवर लिहिले आहे की, ‘लव इज इन द एयर’ असे म्हणत मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाचे सेलिब्रेशन मलायका आणि अर्जुनने गोव्यात केले होते. काही मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत मलायका आणि अर्जुन सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले होते. आता ते व्हॅलेंटाईन स्पेशल एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगत होत्या. मात्र, मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या चर्चेला ब्रेक मिळाला आहे. सध्या तरी दोघे लग्न करणार नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सांगण्यात आली होती. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत.