लव्ह जिहाद : जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत; योगी सरकार तोंडघशी

7

युपी मधील योगी सरकार लव्ह जिहाद कायदा करण्याच्या तयारीत असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने एक महत्वाचा निकाल दिलाय. प्रत्येकाला आपला मनपसंत जोडीदार निवडण्याचा मूलभूत अधिकार आहे. दोन सज्ञान व्यक्तींना एकत्र राहण्याचा अधिकार कोर्टाने दिला आहे, मग त्या व्यक्ती कोणत्याही धर्माच्या असतील, भिन्नलिंगी असोत किंवा एकाच लिंगाच्या, असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं आहे. कुशीनगरमध्ये राहणाऱ्या सलामत अन्सारी आणि प्रियंका खरवार यांच्या केसवर अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी झाली.

दोन सज्ञान व्यक्तींच्या संबंधांबाबत राज्य सरकार आक्षेप घेऊ शकत नाही. कुशीनगरमध्ये राहणाऱ्या सलामत अन्सारी आणि अन्य तिघांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हा निर्णय दिलाय. फक्त विवाहाच्या उद्देशाने केलेलं धर्मांतर अस्वीकार्य आहे, हा चांगला कायदा नाही, असंही कोर्टाने सांगितल्याने संभाव्य धर्मांतरविरोधी कायद्याला मोठा झटका मानला जातो. कोर्टाने सज्ञान स्त्री किंवा पुरुषाला आपल्या मनासारखा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्यांच्या शांततापूर्ण आयुष्यात कोणतीही व्यक्ती किंवा कुटुंब दखल देऊ शकत नाही, असंही हायकोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे योगी सरकारला हा मोठा झटका मनाला जात आहे.