‘लव्ह जिहाद’ बरं मग, धर्म पाहून प्रेम करायचं का ? : अभिनेत्याचा सवाल

8

हरियाणामध्ये घडलेल्या घटनेमुळे देशात पुन्हा लव्ह जिहाद बद्दल चर्चा होते आहे. कर्नाटक सोबतच मध्यप्रदेश सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याचा निर्णय घेण्याचे संकेत आहेत. विधानसभेत लव्ह जिहाद बद्दल विधेयक आणण्यात येणार आहे. यातून लव्ह जिहाद मध्ये 5 वर्षांची शिक्षा करण्याची तरदुत असणार आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जीशान अय्यूबसह अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लव्ह जिहाद विरोधात कायद्याच्या पार्श्वभूमीवर त्याने केलेले ट्विट सध्या चर्चेत आहेत. आता धर्म पाहून प्रेम करायचे का? असा सवाल जिशान अय्युबने विचारला आहे.

प्रेम केल्यास तुरुंगात जावे लागेल किंवा मग प्रेम करण्यापूर्वी धर्म कोणता हे पाहावे लागेल. घाबरू नका, समाजात द्वेष पसरवणा-यांना कोणी टोकणार नाही. उलट त्यांच्यासाठी टाळ्या पडतील. लव्ह जिहादसारख्या तद्दन खोट्या संकल्पनेवर कायदा बनवला जातोय. वाह साहेब वाह, असे ट्विट मोहम्मद जीशान अय्युबने केले आहे.