वाचा सविस्तर काय राहणार बंद काय सुरू..?
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्रिपरिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रकारची वाहतूक सुरु, मात्र गर्दीची ठिकाणे बंद. खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु. रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी. सोमवार दि. ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत होणार अंमलबजावणी. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरू. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे,चित्रपटगृहे,गर्दीची ठिकाणे बंद राहणार.
अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची घेतली काळजी. या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यास सर्वांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.
राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील
यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येईल. या काळात सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू राहील. वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद राहतील. शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती. मनोरंजन, करमणुकीची स्थळे व सलून्स बंद राहतील.
प्रार्थनास्थळे दर्शनार्थींसाठी बंद, दैनंदिन पूजा अर्चा करता येणार. उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद, टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. ई-कॉमर्स सेवा सुरु. वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु. उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील.