महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला आता विनंती नाही इशाऱ्याची गरज, एमपीएससीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे वेळेवर घ्या, अन्यथा गोर बंजारा विद्यार्थी ब्रिगेड रस्त्यावर – बाबासाहेब राठोड

दि. ११ – महाराष्ट्र राज्यातील निवडणूक, अधिवेशने, राजकीय कार्यक्रमाना बंदी नसताना सर्व गोष्टी सुरळीत सुरू असताना MPSC पूर्व परीक्षा पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्यात, सरकारने ही मनमानी बंद करून ठरल्याप्रमाणे १४ तारखेला परीक्षा घ्याव्यात अन्यथा गोर बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीड जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखाली गोर बंजारा विद्यार्थी ब्रिगेड रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा गोर बंजारा विद्यार्थी ब्रिगेड चे गेवराई तालुका अध्यक्ष बाबासाहेब राठोड यांनी दिला आहे.

एमपीएससीची पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलणे ही सरकारी हुकूमशाही आहे, त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये असंतोष असल्याने राज्यभर विध्यार्थी रस्त्यावर आले आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नंतर ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले होते, पण त्यावेळीही या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएसच्या परिक्षेसाठी गाव-खेड्यातून लाखो विद्यार्थी काही वर्ष तयारी करत असतात. अनेकांचे आई, वडील शेतात काम करून, मोलमजुरी करून त्यांना एमपीएसीच्या अभ्यासासाठी शहरात ठेवतात. त्यांची या निर्णयामुळे मोठी आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे.युवकांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने त्यांचे भवितव्य अंधारकारमय होत आहे.सलग पाच वेळ परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

कोरोना काळात इतर विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात. आरोग्य विभागाच्या परिक्षा अत्यंत गोंधळात आणि अनागोंदी ने गाजत असताना ह्या संशयास्पद परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची घाई सरकार करत आहे. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे ?एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा आधी तीन दिवस आधी जाहीर करणे विद्यार्थ्यांच्या भवितव्य सोबत खेळण्याचा गंभीर गुन्हा आहे.

ह्या बाबतीत एमपीएससी प्रमुखांनी राजीनामा द्यावा व महाविकास आघाडी सरकारने तातडीने हा तिढा निकाली काढावा, ठरल्या प्रमाणे १४ तारखेला परीक्षा घ्यावी.आंदोलन करणाऱ्या विधार्थी विधार्थिनी विरुद्ध पोलीस कार्यवाही करणार नाही, ह्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत अन्यथा गोर बंजारा विद्यार्थी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल आणि जर राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील.